श्री मानस,
आपल्या निकषांप्रमाणे काही ओळी नसल्याबद्दल माफ करावेत. मी पुढील रचनांमध्ये असे काही येणार नाही याचा प्रयत्न करेन.
प्रकाशकांनी हे प्रकाशित होऊ दिले आहे यावरून मला वाटले की हरकत घेण्यायोग्य ते नसेलही.
महत्त्वाचे - ही कविता असून गझल नाही. मी स्वतःच या रचनेला गझल म्हणत नाही. त्यामुळे गझलतंत्र थोडेसे दिसून आले तरी तो फक्त भास आहे असे कृपया मानावेत.
आपल्या प्रतिसादाबद्दल मात्र मनापासून धन्यवाद! तसेच श्री सतीश वाघमारे यांचे पण आभार!