इंग्रजी व्याकरणाचे फर्स्ट पर्सन "आय" एकवचन, व "वुई" अनेकवचन असे होते तसेच थर्ड पर्सन "ही" एकवचन , "दे" अनेकवचन असे असते. सन्स्कृत व्याकरणाचे प्रथम पुरुष अहम असे न होता सः , तौ, तान, (एकवचन, द्विवचन व बहुवचन)  असे असते तसेच कुठलाही धातूचे रुप जसेः मि, वः, मः;  असे चालविले जाते. परंतू महाराष्ट्राबाहेर हेच ति, तः, अंती असे शिकविले जाते. त्याचे तार्किक कारण काय असू शकेल? तसेच सन्स्कृत व्याकरणात काळ वेगळे असे नसून लट लकार, लंग लकार इ. असे शब्द आहेत जे महाराष्ट्रा तिल शाळेत शिकविलेच जात नाहि. परंतू अन्यत्र (अन्य राज्यातिल)  शाळेतिल सन्स्कृत पुस्तके आणि सिद्धांत कौमुदी इ. ग्रंथ मात्र असेच सांगतात. त्याचे काय?