बाऊ करणं =एक अवस्था ज्यात 'आधी एका शुल्लक गोष्टीचे भय वाटून घेणं. आणि मग त्या भयाला गोंजारत बसणं. '
भुआ = भूत, नकारात्मक ऊर्जेचे एक स्वरूप, 'बागुलबुवा' ह्या अर्थाचा एक शब्द

'भुआ' चा संदर्भ= 'लहान  मुलांना आटोक्यात आणण्यासाठी उभे केलेले एक सोंग' उदा. :- बाळा बाहेर / तिकडे/ त्या वाटेने जाऊ नकोस, तिथं भुआ आहे. तो तुला घेऊन जाईल.

मला काय म्हणायचं होतं=

'बाऊचा भुआ करणं' = एखाद्या शुल्लक गोष्टीचा सततचा विचार करण्यानं एक काल्पनिक परिस्थिती निर्माण होणं व त्यातून बाहेर येण्यासाठी स्वत:च एक नैतिकदृष्ट्या योग्य भासेल असे एक स्थान निर्माण करणं व त्या परिस्थितीलाच हेच सत्य आहे असे समजून वागणं, बोलणं.
हि अवस्था प्रत्येक व्यक्तीने कधीना कधी काही अंशी अनुभवलेली असतेच.

नवीन म्हण म्हणून कशी वाटते? चालेल का?