मराठी भाषा समृद्ध करण्याची इच्छा बऱ्याच मराठी भाषकांची असते. मी स्वतः त्यातील एक आहे. मराठीत तांत्रिक विषयावर मी पुस्तकही लिहिले आहे आणि त्यावेळी मला जाणवलेली त्रुटी मराठीत मूळ शब्दापासून दुसरे शब्द तयार करण्याच्या फार कमी सोयी आहेत जशा त्या संस्कृत भाषेत आणि इंग्रजी भाषेत आहेत, त्यामुळे परकीय भाषेतील शब्दही इंग्रजीत मूळ इंग्रजीच असल्यासारखे बसले‌अंस्कृतच्याबाबतीत हा प्रश्नच उद्भवला नाही. पण सावरकरांनी भाषाशुद्धीसाठी जे पर्याय सुचवले आणि जे लोकमान्यही झाले (उदाःमहापौर, अभियंता वगैरे) ते त्यांना संस्कृतमधूनच घ्यावे लागले‌  साधा थर्मॉमीटर ला तापमापक हा पर्याय संस्कृत भाषेतूनच घ्यावा लागतो.मराठीत तांत्रिक विषयावर लिहिताना मला बॉयलर, सुपरहीटर, अशा शब्दांना प्रतिशब्द संस्कृतचा आधार घेऊनच बनवावे लागले. आणि ते मूळ शब्दापेक्षा बोजड वाटल्यामुळे मूळ इंग्रजी शब्दच सुटसुटीत आहेत असे वाटू लागले.