एकंदरित कल्पना छान आहे !

या वाहत्या नदीत,

पाणी अपार आहे!

काठावरी परंतु,

कोणी तृषार्त राहे! छान !

पहिले आणि शेवटचे कडवे वृत्ताच्या बाबतीत थोडेसे खटकते,चालीत म्हणता येत नाही.

तारुण्य वैभवाला,

'जरा' शाप येथे,

उमलत्या कळ्यांचे

निर्माल्य नित्य होते!

या कडव्यात 'जरा' ऐवजी 'वृद्धत्व' हा शब्द वापरला तर चालीत बसेल असे वाटते.

'अन उमलत्या कळ्यांचे' असे चालीत बसेल !

पुढील लेखनास खूप शुभेच्छा !