महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या प्रदेशांत राहाणारे सोडले तर इतर भारतीयांना योग हा शब्द उच्चारता येत नाही. त्यामुळे योगा हा 'योग'चा अपभ्रंश नाही तर अमराठ्यांचा शुद्ध उच्चार आहे. संस्कृत जाणणारे योगऽ करतील, मराठी योग्. हिन्दी-पंजाबी भाषक मालाडला 'मलाड', सामानला ''समान म्हणतात. हा त्यांच्या मते शुद्ध उच्चार, आपण करतो तो अर्थात चुकीचा! योग शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग YOG केले असते तर उच्चार यॉग झाला असता, त्यापेक्षा योगा परवडला. अल्लाचे स्पेलिंग ALLA केले तर उच्चार अल्ल होईल, म्हणून स्पेलिंग ALLAH'. इंग्रजीत आकारान्त शब्द नाहीत. एकारान्तही नाहीत. PLAYचा उच्चार प्लेइ, GREYचा ग्रेइ. एकारान्त शब्द लिहिता येत नाहीत म्हणून A-कारान्त स्पेलिंग. म्हणून कुर्लेचे(कुर्लं)स्पेलिंग COORLA आणि गोवे(गोवं)चे GOA करतात. तसेच खंडाळे(ळं) लोणाव(ळे)ळं इत्यादींचे!
त्यामुळे रूढ झालेली इंग्रजी स्पेलिंगे तशी का केली हे समजून घ्यावे, आणि मगच स्पेलिंग बदलण्याचा विचार करावा.