इंग्रजी शब्द आणि त्यासाठी बनवलेला मराठी पारिभाषिक शब्द यांची तुलना करून पहा. इंग्रजी सोपा की मराठी?  इंग्रजी फार सोपा आणि मराठी फार अवघड असेल तर इंग्रजीच वापरा.  शक्य असेल तर त्याचे 'मराठीकरण' करा. ऍकॅडमीसाठी सावरकरांचा शब्द आहे प्रबोधिका, मराठीने प्रबोधिनी करून घेतला आणि तो वापरला जातो(संरक्षण प्रबोधिनी इ.इ.); हिन्दीत अकादमी म्हणतात, तोही काही वाईट नव्हता, परंतु आचार्य अत्र्यांसारख्या अनेक मराठी विद्वानांनी पुण्यातल्या या संस्थेला कुणी अक्का(बाई) किंवा डमी म्हणू नये, म्हणून प्रचंड टीका करून तिचे नाव संरक्षण प्रबोधिनी करायला लावले.  प्रबोधिनी हा मुळातच फार सुरेख शब्द आहे ही गोष्ट मान्यच करायला हवी. त्या शब्दाबद्दल आचार्य अत्र्यांना धन्यवाद!