स्वामीयोगेशांनी जर, मी वर दिलेला वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा दुवा उघडून पाहिला असेल, तर संस्कृत ग्रंथ लिहिणारे ९९ टक्के विद्वान महाराष्ट्राच्या बाहेर आहेत हे त्यांना कळून चुकले असेल. आता इंग्रजांना संस्कृत कुणी शिकवले ते उघड होईल. संस्कृत भाषेतले नियम इतके सुस्पष्ट आणि कठोर आहेत की, परकीयांच्या सोईसाठी त्यांत मोडतोड करून संस्कृत शिकवता येत नाही.