तुमच्या कल्पनाशक्तीला, आणि एकंदर गोष्टीच्या मांडणीच्या कौशल्याला सलाम. पहिल्या भागात नायक बँकेत जात नाही त्याच वेळी असे काही तरी असावे अशी पुसटशी शंका आली होती. तरी शेवटपर्यंत गोष्ट कशी जाते ह्याची उत्कंठा होतीच.
शेवट हृदय चिरणारा आहे. (राजहंस माझा निजला ची का कोण जाणे आठवण झाली. आमच्या सरांना ती कविता पूर्ण वाचता आली नव्हती त्याची आठवण झाली. )
रत्नाकर मतकरींच्या शाळेच्या रस्त्याचीही आठवण झाली.
जी एंच्या गोष्टीत आणि सतीश आळेकरांच्या नाटकांत असे मनाचे खेळ असतात.
मस्त गोष्ट.