छोट्या बहरात गझल लिहिणे तसे कठीण आहे. प्रयत्न दाद देण्यासारखा आहे; पण बरेच शेर अस्पष्ट वाटतात. एखाद्या शेराचा नीट विचार करताना विशिष्ट कालमर्यादेपलीकडे वेळ लागला तर अ) शेर अस्पष्ट आहे किंवा ब) माझी समजून घ्यायची कुवत नाही, असे दोन पर्याय (निदान) माझ्यापुढे असतात. पैकी पर्याय अ किती वेळा आणि पर्याय ब किती वेळा हे पाहणे रंजक असले तरीही पहिल्याच वाचनात शेर पूर्ण समजणे, दुसऱ्या वाचनात त्याचे इतर एक/अनेक अर्थपदर उलगडले जाणे व त्यामुळेच तिसऱ्या वाचनाचा मोह होणे, आणि सरतेशेवटी अशा तिसऱ्या वाचनात 'वाहव्वा'ची दाद मिळणे असे झाल्यास शेर 'भिडला', 'आवडला' असे काहीसे (मला) म्हणता येते. थोडक्यात, अशी सुलभता मला वरीलपैकी एकाच शेरात दिसली. ओठ-पोट वाला तो शेर. इतर शेरांमध्ये मिसऱ्यांच्या काहीशा कमजोर परस्परसंबंधांमुळे समजणे जड गेले / शेर स्पष्ट वाटले.चू. भू. द्या̱. घ्या.
ओठापोटाच्या शेरात 'ओठात शब्द काही' च्या ऐवजी 'ओठांत शब्द थोडे' असा बदल (मला) सुचला जेणेकरून वरच्या ओळीतील थोड्याशी खालच्या ओळीतील 'फार'चा थेट संबंध लागून शेर अधिक आवडू शकेल / 'अपील' होईल.