ते 'छंद' पोसताना निघते असे दिवाळे
'गागाल गाल' गाता की गालगुंड झाले
तोंडास फेस माझ्या कोणास ना कळाले
वृतात मी लिहीले ह्याचेच वृत्त झाले !
हाहाहा. मस्तच. सोबतीला केशवसुमार ह्यांचे आताशी मी फक्त विडंबन गझलांचे करतो हे दणदणीत विडंबन आठवले. आणि भयंकर हसू आले.
छंद नको मज कुठलाही अन् ताल नको आहे
मात्रा कसल्या? मुळात मजला वृत्त नको आहे
ह्या वृत्तांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला