इंग्रजी भाषेत विशेषनामे कॅपिटल अक्षराने सुरू करण्याचा शिरस्ता आहे. जर आपल्या म्हणण्याप्रमाणे लेखन करायचे झाले तर तो सोडून द्यावा लागेल. अन्यथा तन्मय च टन्मय थोरात चे ठोरात देव चे डेव असले घोळ होतील. म्हणजे काही मराठी शब्द इंग्रजीत लिहून नीट उच्चारता यावेत यासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचा उगाचच घोळ घालून ठेवायचा. आंतरराष्ट्रीय फोनेटिक लिपी हा उपाय कागदावर सर्वोत्तम आहे. पण एक म्हणजे ती सर्वांना ठाऊक नसते, दुसरे म्हणजे तिच्या वापराने उच्चार कसा आहे हे एकवेळ तत्त्वतः कळेल पण आपापल्या भाषेशी संबंधित वर्णसमूह जाणणाऱ्या लोकांना तो उच्चार प्रत्यक्षात करता येईल का? ९९% वेळा नाही! भाषाभाषांमध्ये फरक हा असणारच! आपलं काही इतरांना जमत नाही, इतरांचं काही आपल्याला जमत नाही. त्यात एवढं काय मोठंसं?
(काही भाग संपादित : प्रशासक)