शुम, मथित आणि त थ बद्दल विवेचन केल्याबद्दल (तुमचे! ) आभार आणि (तुम्हाला!! ) धन्यवाद
अलिकडे मथित म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या लोकांना मतितार्थ हा शब्द खटकत नाही यात फारशी नवलाची गोष्ट नाही असे वाटते.
 रवीने ताक घुसळल्यानंतर मिळणारे लोणी हे त्या घुसळण्याच्या क्रियेचे मधुर फल असते किंवा क्षीरसागराचे( बहुधा क्षीरसागराचेच असावे नसल्यास क्षमा करावी) मंथन करून जे निर्माण केले गेले ते अमृत होते , शिवाय ताक घुसळण्याची क्रिया वाटते तितकी सोपी नाही या सर्व गोष्टींचा संदर्भ त्या मथितार्थाला असतो असे वाटते. याला आणखी काही संदर्भ / अर्थछटा असतील तर त्या कृपया सांगाव्यात ही विनंती.
(पानजाळी सळसळे , वळे(?) ती मथित हृदय कवळीत, त्या तरूतळी विसरले गीत हा चटकन आठवलेला 'मथित' चा एक वाक्यात किंवा काव्यात उपयोग... )

--अदिती