till आणि   until  या शब्दांचा नेमका मराठी / इंग्रजी अर्थ काय? जोपर्यंत आणि तोपर्यंत अशा त्याला छटा आहेत काय? की दोन्ही शब्द समानार्थी असून त्यांची कशीही अदलाबदल केली तरी मूळ इंग्रजी वाक्याचा अर्थ बदलत नाही? आणि असे असेल तर त्यांचे मराठी भाषांतर कसे करावे?
उदा. यावच्चंद्रदिवाकरौ याचे इंग्रजी भाषांतर करताना ' टिल द सन ऍन्ड  द मून एक्झिस्ट ' असे करायचे की ' अन्टिल द सन ऍन्ड द मून एक्झिस्ट ' असे करायचे?

--अदिती