मनोगतावर टंकताना पायमोडक्या अक्षरानंतर डॉट एस् ह्या कळी दाबल्या की, हलन्त अक्षर पुढल्या अक्षराला जोडले जात नाही.
हलन्त अक्षरानंतर वाचणारा किंचित थांबतो. सत्यम् हा शब्द मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार (शेवटच्या अक्षराचा पाय मोडू नये!) सत्यम असा लिहिला जातो. परंतु सत्यम नावाच्या कंपनीसंबंधी लिहिताना, 'सत्यमला' असे लिहिले तर वाचणारा कदाचित सत्यवतीसारखे 'सत्य मला' असे वाचण्याची शक्यता आहे. असे होऊ नये त्यासाठी म् नंतर थांबण्याची गरज आहे. सत्यम्ला असे लिहिले की कुठलाही संभ्रम राहणार नाही.
सद्वर्तनची मी फोड करून दाखवली, ती केवळ सद्नंतर थांबू नये हे पटवण्यापुरती मर्यादित होती, र्नंतर थांबावे हा उद्देश नव्हता. सद्वर्तन हा शब्द कुठीही न थांबता एका दमात उच्चारल्यास चांगले.
बालोद्यानचा एका छोट्या मुलाला उमजलेला अर्थः बालोद्यान अशी पाटी असलेल्या एका बगिच्याच्या फाटकाबाहेर उभा राहून एक मुलगा आईकडे हट्ट करीत होता, 'मला या यानात बसायचे आहे, लवकर आत चल! " मलाही तो अर्थ पटला, तुम्हां सर्वांना पटावा.
जोडाक्षरे, आणि त्यांतल्या त्यांत जोडाक्षरांची उभी रचना, ही मराठीची संस्कृती आहे, केवळ टंकलेख्ननयंत्राच्या सोईसाठी तिला बिघडवू नये. शासकीय मराठी पुस्तकातल्या द्वंद्वामुळे एक पिढी सुवाच्य लेखन-वाचनापासून दूर गेली आहे.