या चॅनेलवरचा हा कार्यक्रम होता की जहिरात?  कार्यक्रम असेल तर चॅनेलवर फौजदारी खटला भरता येऊ शकतो.  जहिरात असेल तर चॅनेलवर खटला करता येऊ शकतो का कल्पना नाही.  तुमच्या लेखात चॅनेलचं नाव वगैरे तपशील दिले असते तर बरं झालं असतं.  बाकी काही नाही तरी निदान त्यांचं नाव तरी थोडं खराब झालं असतं.  इतपत तरी आपण करू शकतो आणि ते केलंच पाहिजे, अशा मताचा मी आहे. 

अवांतरः  आमच्या मित्रमंडळीत दृष्ट लावण्यालाच 'फणस लावणं' असा वाकप्रचार वापरतात!  म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या आजोळी फणसालाच फणस लावतात असं म्हणता येईल! आणि कुणी फणसाला फणस लावलाच तर लगेच तुम्ही त्याला लॉकेट लावा!!