प्रीति तुमचा मला खूप अभिमान आहे. नर्मविनोदी शैलीत सहजपणे दर्जेदार लेखन करणाऱ्या स्त्रिया फार मोजक्या असतात. स्त्रियांचा कल बरेचदा आयुष्यातल्या प्रतिकूल अनुभवांवर लेखन करण्याकडे, वेदना / सोशिकता / धैर्य / जिद्द / वैताग /निषेध व्यक्त करण्याकडे असतो. पण आयुष्यातल्या साध्या अनुभवांकडे गमतीने पाहून हसण्या हसवण्याकडे त्यांची प्रवृत्ती कमीच असते. तुम्ही अशा अभिमानास्पद अल्पसंख्यांक आहात. खरंच तुमचं मनोगतावरचं सगळं लेखन मी वाचलं आहे आणि नवीन काय आहे हे शोधताना मी तुमचं नाव अगदी आवर्जून शोधते. मस्त लिहिता खूप. मजा येते वाचायला. शुभेच्छा