आदरणिय चैतन्यजी दीक्षित, आपल्या प्रस्तुत विवेचनाने खुप खुप समाधान झाले. एकुण २३/२४ उत्तररुपी योगदानांनंतर आपले विवेचन म्हणजे, खर्या अर्थाने " मथितार्थ " म्हणला पाहिजे. येथे मथितार्थ मी, महत्प्रयासाने काढलेल्या लोण्याच्या अर्थाने घेतला आहे. आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्हा इंग्रजाळलेल्या मराठी माणसांकडे शब्द तोकडे असतात. आणि आमच्या व्याकरणाचे तर जाहिर प्रदर्शन झालेले असते. तरी शतशः धन्यवाद !!
सर्व योगदायकांचे मनःपुर्वक आभार !!!
श्री. शुद्ध मराठींच्या मार्गदर्शनाचे विशेष आभार.
आपले विवेचन हे सर्वांनी संग्रही ठेवण्यासारखे तर आहेच, पण याच असहज आणि असामान्य ज्ञानासोबत दात्याचीही आठवण कायम ठेवावी असेच सर्वांना आवाहन आहे.
श्री. अद्वैतुल्लाखान, मिलींदजी फणसे, वरदाजी, अदितीजी, दिलीपजी वसंत सामंत, अलकाजी विद्वांस सर्वा सर्वांचे मनातून जाहिर आभार.
मनोगत डॉट कॉम चे, चर्चेसाठी व्यासपीठ दिल्याबद्दल मनातून आभार.
मनोगतावरचा पहिला वहिला अनुभव गोड केल्याबद्दल सर्वांचे शतशः धन्यवाद !!!!
मला अशा एखाद्या अष्टावधानी प्रयोगाचा सार्वजनीक साक्षीदार व्हायला नक्कीच आवडेल. माझा ईमेल आय डी दुवा क्र. १ आहे. कागवटे = के ए जी डब्ल्यू ए टी ई