जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही

छा न


मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही

छान. वेगळा शेर.

[.... मी रोज पाहत असलेले दृश्य असे -  उभ्या राहिलेल्या त्याच मॉलमधले अनेक कर्मचारी; झालंच तर शेजारच्याच झकपक काचेरी काचेरी इमारतीमधील आयटीयन्स (यू नो!!! ) रस्त्यात उभे राहून (वाहतूककोंडीला 'पायभार ' लावीत! )  आमच्या 'म्हादू'च्या टपरीमधील स्पेशल चहा मोठ्या झोकात पीत असतात.
या 'म्हादू'ला मी एकदा उत्सुकतेपोटी विचारले -  'तुझे दिवसाकाठचे उत्पन्न किती? '
त्याने उत्तर दिले - 'भांडवल वगळता हजार ते बाराशे रुपये! '
अर्थात, तुमच्या म्हादूचे, मर्ढेकरांच्या गणपत वाण्यासाऱखे, किराणा दुकान असेल तर मात्र कुणास ठाऊक हां! )