भारतात ज्या दिशेकडून वर्षाऋतू येतो त्या दिशेला नैरृत्य(निर्+ऋत या देवतेची दिशा)म्हणतात. पाकिस्तानचा वायव्य सरहद्द प्रान्त ज्या दिशेला आहे ती वायव्य दिशा. ईस्ट इंडीज बेटे भारताच्या आग्नेयेला आहेत. याच दिशेला असलेला तमिळनाडू सदैव अग्नीसारखा तप्त असतो. (तमिळनाडून तीन ऋतू आहेत.. उन्हाळा, कडक उन्हाळा आणि अतिकडक उन्हाळा. हॉट, हॉटर व हॉटेस्ट). भारताच्या ईशान्य भागात आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश वगैरे राज्ये/इलाखे आहेत. इकडेच हिमालय पर्वत आहे आणि त्यावरील कैलासावर श्री शंकरासकट अन्य ईश आहेत.