सहकारी पत संस्था बँका नव्हेत. त्यांच्यावर रिझर्व बँकचे काहीच नियंत्रण नाही. पत संस्थेतील ठेवींना ठेव विमा महामंडळाचे विमा संरक्षण नाही.

अनेक पत संस्था चांगल्या चालल्या आहेत हे खरे. सारेच काही अ-प्रामाणिक नाहीत.

पण व्यवस्थापकांना कर्जांचे व्यवस्थापन जमले नाही तर पत संस्था अडचणीत येऊ शकते. अर्थात त्या जादा व्याज देत असल्याने, ज्यांची जोखीम पत्करण्याची मानसिक तयारी आहे, त्यांनीच तेथे ठेवी ठेवाव्यात हे उत्तम!