पुण्याहून जाणाऱ्या कोणत्याही ट्रेनने कर्जत पर्यंत जावे. तेथून लोकल ट्रेनने नेरळ. नेरळहून टॉय ट्रेन माथेरानला जाते. सकाळी सात वाजता पहिली गाडी आहे. त्यानंतर ८.४५, १०.१५. यानंतर ही टॉय ट्रेन असते. पण सकाळी लवकर जाणे चांगले. (कर्जत/ नेरळहून टॅक्सीज ही मिळतात असे कळते. पण त्या तीन किलोमिटर अलिकडेच थांबतात.)
माथेरान मध्ये शेकडो हॉटेल्स आहेत. बरीच महागडी ही आहेत. पण स्वस्त हॉटेल्सही आहेत. शक्य तो ऐन गर्दीचे( सुट्ट्यांचे) वस टाळून जाणे योग्य! सामान्य उपाहारगृहातील खाद्य पदार्थ फार महाग नाहीत.
माथेरान मध्ये वहाने नाहीत. सर्वत्र चालत जावे लागते. घोडे आथवा माणसांनी ओढण्याच्या गाड्या ही असतात. पण खर्च खूपच वाढतो. प्रेक्षणीय अशी ७-८ स्थळे आहेत. रोज १०-१२ किलोमिटर्स चाल ठेवल्यास दोन रात्रींचा मुक्काम पुरे!
स्थळ सुंदर! अधिक राहाणे शक्य असल्यास अवश्य रहावे