माथेरानपर्यंत कसे पोहोचायचे ते वरील प्रतिसादात आले आहेच. थोडीशी हॉटेलांची माहिती सांगते. अनेक हॉटेले आहेत हे खरेच. माहीत असलेली काही सांगते.
आपण मोठ्या संख्येने जाणार असाल आणि डॉर्मिटरी प्रकारची व्यवस्था हवी असेल तर खान्स गेस्ट हाउस उत्तम आणि खिशाला परवडेलसे आहे. टॉय ट्रेन च्या स्टेशनाजवळच ते आहे. त्याच्या समोरही पूर्वी एक अशा प्रकारचे गेस्ट हाउस होते. आता कल्पना नाही. थोडे आतल्या बाजूस माणेकलाल टेरेसेस नावाचे मस्त गुजराथी हॉटेल आहे. तिथे राहण्यासाठी डॉर्मिटरी आणि दोघांसाठी खोल्या / कॉटेजेस आहेत. तिथे राहिला नाहीत तरी जेवायला एकदा नक्की जाण्यासारखे आहे. मस्त जेवण!
हॉटेल प्रीतम, प्रिन्स, कविता, हिल व्ह्यू, वगैरे हॉटेले आपल्याला हव्या त्या प्रकारात मोडतात. शिवाय एम. टी. डी. सी. आहेच.