(असा काही तरतमभाव नसावा.

संस्कृतमध्ये हे सर्व शब्द भगवत् (आणि श्रीमत् ? ) शब्दाप्रमाणे चालतात असे वाटते.

तेथे

भगवत् असे रूप असले तरी विभक्ती लावताना

भगवान् - भगवंतौ - भगवंतः ... असा तो शब्द चालतो. ह्यानुसार व्याकरणाप्रमाणे वान बरोबर वाटते. भगवंत किंवा श्रीमंत अशी एकवचनाची रूपे नसावीत.)

मराठीत हे शब्द वापरताना मात्र एकवचनात वान आणि आदरार्थी करण्याच्या हेतूने अनेकवचन वापरताना वंत अशी रीत सुरवातीला निर्माण झाली असावी. पुढे हा फरक नाहीसा होऊन दोन्ही रूपे एकाच अर्थाने वापरली जाऊ लागली असावीत असे मला वाटते.

(माझ्याकडे कुठलेही संस्कृत वा मराठी संदर्भग्रंथ नाहीत. हे मी सर्व अंदाजाने लिहित आहे.) (चू. भू. द्या. घ्या. )