इतर चारचौघांहून आपल्याला जास्त आनंद/दुःख/राग/देशभक्ती/चांगुलपणा/त्यागवृत्ती आहे असे सार्वजनिक ठिकाणी बटबटीतपणे दाखवण्याच्या मनोवृत्तीला जिंदादिली म्हणतात असे आमचे एक स्नेही सांगतात. त्या त्या भावनेच्या वेळी प्रसंग वेगळा असला तरी जल्लोष तोच असतो. आनंद असल्यास मोठमोठ्याने आरोळ्या देणे. दुःख असल्यास छाती बडवून टाहो फोडणे. संताप असेल तर अर्वाच्य बोलणे हिंसा करणे, अशी काही उदाहरणे. इतर भावनांच्या बाबतीतही तुम्हाला अशी उदाहरणे दिसतील असे ते सांगतात.