आजच दासबोधात, " अष्टधा प्रकृती" बद्दल  वाचण्यात आले. पंचमहाभुते + सत्त्व +रज + तम = ८ धा प्रकृती, असे तेथे म्हटले होते. तर,  अश्या सुत्रात्मक संकल्पनाचा " अष्टावधाना" शी काही "सुतराम / बादरायण "संबध असण्याची काही शक्यता??

हा प्रश्न का पडावा?

एक तर " अष्टावधान " हे संख्यावाचक [व्यक्तीमत्वाचे] विशेषण आहे. ते जर सर्वसाधारण अर्थाने वापरावयाचे तर "बहुअवधानी" असे देखील वापरता आले असते. तसेच ते " अष्टपैलू" [परत व्यक्तीमत्वाचेच, कोणकोणते पैलू ? ] सम्राटांबद्दल प्रकर्षाने वापरले गेले आहे. ज्यांना अनेक शास्त्रे/ विद्या / कला / कौशल्ये  अवगत / आत्मसात होती. तर त्यातील अति महत्त्वाची [लघुत्तम साधारण / महत्तम साधारण विभाज्य / विभाजक ]अशा स्वरुपाची निवडक शास्त्रे, विद्या, कला वा कौशल्ये जी की राजा बनण्यासाठी ची "किमान पात्रता " सिद्ध करित असावीत, असे वाटते. राजाची / सम्राटाची,  निवड /परीक्षण / विश्लेषण सुत्रबद्धच होत असावी / नसावी? आपणाला काय वाटते?

"अष्टपैलू व्यक्ती " म्हणजे कोणकोणते ८ पैलू असलेली व्यक्ती???

हा प्रश्न उरतोच.....

ता. क. : पंडीताच्या बाबतीत " अष्टावधानी " च्या निरुपणाचे समाधान झाले. पण राजा / सम्राटाच्या बाबतीत ते चपखल बसत नाही, असे मला वाटते. "भाषीक कसोटी" पंडीताला अष्टावधानी ठरवण्यास " आवश्यक व पुरेशी" आहेच. necessary n sufficient condition.