इथे नेमका आक्षेप कशाबद्दल आहे ते स्पष्ट झाले नाही. हा प्रकार २६ जानेवारीला झाला म्हणून असेल तर बहुतांशी लोक २६ जानेवारी सुट्टी म्हणूनच घालवतात. त्या दिवशी काय करावे हा त्यांचा प्रश्न असतो. आक्षेप हिडीस नृत्याबद्दल असेल तर हिडीस म्हणजे नेमके काय? गणपतीच्या मिरवणुकांमध्ये बरेचदा जे नृत्य बघायला मिळते ते हिडीस असते का? याचबरोबर त्या मिरवणुकीमध्ये वाजवली जाणारी गाणी कशी असतात? नाचणारे युवक (विविध रसायनांच्या अमलाखाली असल्यामुळे) काही समजून घेण्याच्या मनस्थितीत असतात का? मग हे गणेशोत्सवाला चालू शकते तर २६ जानेवारीला का नको?
आणि मुले नाचत असली तर मुलींनाही नाचावेसे वाटू नये का? त्यांनी का नाचू नये?
अशा मनोवृत्तीमधूनच श्रीराम सेनेसारख्या संघटना जन्माला येतात. लोकशाहीमध्ये इतरांचे वर्तन आवडत नसले तरी सहन करण्याची वृत्ती हवी. ती नसेल तर लोकशाहीची हूकूमशाही व्हायला वेळ लागत नाही.
हॅम्लेट