कटककर साहेब,

आपल्या मते जर हीडीस प्रकार ३ तास चालू होते तर त्याबाबत जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविता आली असती. आपण तसा काही प्रयत्न केला का?  आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याकडे फोटो सुद्धा होते. मग ते दाखवून  तक्रार दाखल का नाही केली आपण?

पोलिस काही करत नाहीत असं नसतं हो प्रत्येक वेळी. आणि समजा असं धरून चाला की पोलिसांनी काही केलं नाही. मग इथं लिहीताना तसा उल्लेख करता आला असता तुम्हाला. की मी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करून सुद्धा अमुक अधिकार्यांनी माझी तक्रार दाखल करून घेतली नाही. आता कुणाचे काही काँटॅक्टस आहेत का?

नुसतंच फोटो कुठे दाखवू लेख कुठे लिहू याला काहीच अर्थ नाही.