माननीय हॅम्लेट,

आपल्या प्रतिसादावर माझी मते नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.

१. ही घटना २६ जानेवारीला घडली याबद्दल मला काही वाटत नाही. खरे तर तेही वाटायला पाहिजे, पण मी स्वतःच सुट्टीच्या दिवशी कुटुंबाबरोबर वेळ घालवतो, फिरायला जातो, बाहेरच जेवून येतो वगैरे! अगदी काही देशप्रेम व्यक्त करतो असे नाही. राष्ट्रपित्याबद्दल तसा सर्वांनाच आदर आहे, मलाही आहे. माझा आक्षेप नेमका या गोष्टीला आहे की जी वास्तू खास गांधीजींच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठी आहे तिथे असे झाले. मूर्तीवर शेण टाकले तर दंगा होतो. मशिदीसमोरून गणपतीची मिरवणुक गेली तर पोलीस व्यवस्था तैनात करावी लागते. गांधींबद्दल चुकुनही गैर शब्द निघाला तर दंगा होतो. अशा गांधीजींच्या स्मारकात असे व्हावे हे माझ्यामते गैर आहे.

२. हिडीस - आपण कुठे वास्तव्य करता ते मला माहीत नाही. पण भारतामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी 'सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून स्त्री पुरुषांनी एकत्र नृत्य करणे' हे हिडीस समजले जाते. हिडीस म्हणजे जे चारचौघात पाहवेसे वाटत नाही ते. उदाहरणार्थ, त्यादिवशी एक १७/१८ वर्षाची मुलगी 'कोंबडी पळाली' या गाण्यावर उत्तेजक हावभाव करत, अतिशय वेगवान हालचाली करत नाचत होती. हळू हालचाली केल्या तर चालेल का असे कृपया विचारू नका, का कुणास ठाउक, मला असे वाटले की आपण असे विचाराल! वेगवान म्हणजे बेभानपणे, आपल्याबरोबर नृत्य करणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे न पाहता, कुणाचा आपल्याला कुठे धक्का लागत आहे याकडे लक्ष न देता! हे संस्कृती सापेक्ष आहे. म्हणजे डान्सबारमध्ये एखादी मुलगी तशी नाचली तर ते गैर दिसणार नाही. ( गैर आहेच, पण त्या वास्तूमध्ये ते गैर समजले जाणार नाही ). एखादी मुलगी चित्रपटाच्या सेटवर नाचली किंवा अमेरिकेत नाचली तर गैर वाटणारही नाही कदाचित! पण इथल्या संस्कृतीमध्ये ते माझ्यामते गैर आहे.

३. गणेशोत्सवातील नाचणे - वाचकांना तो नाच कशाप्रकारचा होता हे लक्षात यायला मदत होईल म्हणून मी गणेशोत्सवाचे उदाहरण दिले. याचा अर्थ मला गणेशोत्सवातील नृत्य मान्य आहे असा घेऊ नयेत.

४. मुलींनी नाचणे - जरूर, मुलींनासुद्धा नाचावेसे वाटण्यात काहीच गैर नाही. आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगतो, की मुलींचे वर्तन हे काही प्रमाणात काही गुन्हे घडण्यास कारणीभूत ठरू शकते. जसे अतिप्रसंग, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून बळी जाणे, वगैरे! पुन्हा वाचा, त्याला फक्त तेच एक कारण आहे असे मी म्हणत नसून तेही एक कारण आहे असे म्हणत आहे. याची जाण पालकांना असते व ते ती मुलीला देतात. तारुण्यसुलभ आकर्षणामुळे एखाद्या मुलीने ते विचार धुडकावून एखाद्या मुलाबरोबर सार्वजनिक ठिकाणी नाच केला तर त्याची जबाबदारी जरी तिच्यावर असली तरी भोगावे इतरांनाही लागते. तेव्हा मुलींनी नाचायचे असल्यास जरूर नाचावे, पण सोबती कसे आहेत किंवा विश्वासातील कुणी बरोबर आहे की नाही हे पाहिल्यास बरे होईल. मला खात्री आहे की त्यादिवशी अनेक मुलींच्या घरी ते माहीतही नसेल. मला वाटते की 'मुलींना नाचावेसे वाटते' या गोष्टीसाठी आपण स्वत: जगातील प्रत्येक मुलाच्या वर्तनाची खात्री नक्कीच देऊ शकणार नाही.

5. श्रीराम सेना - या सेनेच्या निर्मीतीमागची कारणे मला ठाउक नाहीत. पण उद्देश संस्कृतीरक्षणाचे असतील तर गैर नसावे. अर्थात मला काहीच माहीत नसल्यामुळे त्यावर मी बोलू शकत नाही.

६. लोकशाही - आपण जे मूल्यवान विचार मांडले आहेत ते हास्यास्पद आहेत. लोकशाही आहे तर डान्स बार, मसाज पार्लर्स, कुंटणखाने, मटक्याचे अड्डे, रेव्ह पार्टी यावर टीका कशाला करायची?   ज्याला ड्रग्ज घ्यायची आहेत त्याला घेऊदेत की! लोकशाही म्हणून गांधीभवनात ओंगळवाणे नाच चालवून घेणे आपल्याला कुठल्या मनस्थितीमध्ये मान्य झाले असावे काही समजत नाही.

७. सहन करण्याची तयारी हवी - हे विधान वाचून हसावे की रडावे हे कळत नाही. मला जसे माझ्या माहितीतील एखादी मुलगी अशी नाचताना पाहणे आवडणार नाही तसेच इतरही कुठली मुलगी असली तरी वाटायला पाहिजे. कशासाठी सहन करायचे? नाचायचे तर ढाबे कमी आहेत का? नाहीतरी गांधीभवन बूक करण्यासाठी खर्च केलेलाच होता.

असो. मी ते आधीच सकाळकडे दिले आहे. बघुया कय होते ते!