राष्ट्रपतीचा उमेदवार करण्याचा फक्त भारतीय दास्य मनोवृत्तीच विचार करू शकते.
असे नाम्या ह्यांनी म्हटले आहे... परंतु 'भारतीय दास्य मनोवृत्ती' हा शब्द खटकला.
मूर्तींनी केलेल्या राष्ट्रगीताच्या अपमानाचा मुद्दा माहिती नाही असे गृहित धरल्यास,
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्याबद्दलची एकूण प्रतिमा - ' भारताचे अत्यंत जबाबदार, समाजहित जाणणारे.... वगैरे वगैरे' अशीच होते. (ह्याला सुधा मूर्तींचे लिखाण हे कारण असावे) आणि ती प्रतिमा आहे म्हणून त्यांचा राष्ट्रपती पदासाठी विचार केला असावा असे मला तरी वाटते.
नाम्या ह्यांना जर ही भारतीय नेत्यांची 'धनलोलुप वृत्ती' असे म्हणायचे असेल, तर तसा स्पष्ट उल्लेख करावा.
काही नेत्यांसाठी सर्वच भारतीयांच्या मनोवृत्तीला दास्यवृत्ती म्हणणे पटत नाही.
बाकी, राष्ट्रगीताचा अपमान केला असेल, तर ती व्यक्ती कुणीही असली तरीही तिचे कृत्य हे निंद्यच आहे.