माननीय भूषणराव,
नेमका आक्षेप कशाबद्दल होता हेच कळाले नव्हते. म्हणूनच प्रतिसादात तसे विचारले होते. आक्षेप गांधीभवनात हे घडले याबद्दल असेल तर समजू शकतो. लोकशाहीबद्दल मी जे म्हटले त्यात दुसऱ्याच्या वर्तनामुळे आपल्याला काही इजा पोचत नाही ना किंवा हे वर्तन कायद्याच्या कक्षेत बसते किंवा नाही अशा गोष्टी अंतर्भूत आहेत. ड्रग्ज घेणे कायद्याच्या विरुद्ध आहे त्यामुळे ते सहन करण्याचा प्रश्नच येत नाही.
श्रीराम सेना सध्या चर्चेमध्ये आहे याचे कारण आपण वर्तमानपत्रात वाचलेच असेल. त्यांचा उद्देश तथाकथित संस्कृतीरक्षणाचाच होता. ते रक्षण कसे केले हे आपण चित्रफितीमध्ये पाहिले असेलच.
आपल्या मुद्दा क्र. ४ बद्दल सांगावेसे वाटते की मंगमोरमध्ये मुलींना श्रीराम सेनेच्या तथाकथित संस्कृतीरक्षकांनीच मारहाण केली, शिव्या दिल्या, त्यांचे कपडे फाडले. हे कुठल्या संस्कृतीत बसते?
संस्कृतीरक्षणाबद्दल बरेचदा ऐकले आहे. शिवसेनेने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दुकाने फोडणे हे ही याच संस्कृतीरक्षणासाठे झाले. इथे प्रश्न असा पडतो की आपली नेमकी संस्कृती कोणती? ज्या देशात कामसूत्र लिहीले गेले त्या देशाने व्हॅलेंटाइन डे मुळे संस्कृती भ्रष्ट होते असे म्हणावे हा दुटप्पीपणा झाला. इथे श्रीराम लागूंचे सामनामधील वाक्य आठवते, " आपली संस्कृती इतकी महान आहे की ती नेमकी काय आहे याचा कुणालाही पत्ता नाही. "
हॅम्लेट