भाषाईडीया ह्या संकेतस्थळावर मराठी आय. एम. ई. ही फाईल आपल्या संगणकावर उतरवून कार्यरत करून घ्या. आता 'गमभन' वा 'बरहा' ह्या पैकी कोणतीही संगणक प्रणाली न वापरता  विंडोज एक्सपी मध्ये थेट वर्ड, एक्सेल, नोटपॅड इत्यादींवर देवनागरीतून मराठी टंकीत करू शकता. मुख्य म्हणजे हि फाईल कार्यरत केल्यानंतर मराठी भाषा टंकनासाठी आपल्याला (त्यांनीच उपलब्ध करून दिलेल्या) हव्या त्या कळफलकाचे स्वरूप आपल्याला निवडण्याचे स्वातंत्र ही आहे. उदा. - गोदरेज, रेमिंग्टन, फोनेटीक इत्यादी. ह्यामुळे संगणकावर जवळ-जवळ हवं तिथं मराठीतून लिहीता येतं.

दुवाः दुवा क्र. १