श्री. कटककर यांच्या कवितांचा कार्यक्रम असताना त्यापूर्वीचा कार्यक्रम वेळेत न आटोपणे हेच फक्त आक्षेपास योग्य कारण ठरू शकते. त्यापूर्वीचा कार्यक्रम कोणत्या प्रकारचा होता त्यावर मेंगलोरमधील श्रीरामसेनेप्रमाणे हल्लाबोल करण्याची अपेक्षा करणे म्हणजे देशात तालिबानींना उत्तेजन दिल्यासारखे होईल‌. सर्वभाषिक ब्राह्मण संमेलनात ब्राह्मणांनी जानवे शेंडी धारण करण्याचा आग्रहही त्याच प्रकारचा आहे.आणि त्याला विरोध दर्शवणाऱ्या व्यक्तीला माफी मागावयास लावणे ही गोष्टही त्याच तालिबानी वृत्तीची द्योतक आहे.