संस्कृतमध्ये वत् , मत् ( त चा पाय मोडलेला) असे प्रत्यय आहेत. आणि महेश यांनी म्हटल्याप्रमाणे ते श्रीमत् वा भगवत् या शब्दाप्रमाणे चालतात. भगवत् या शब्दाचे प्रथम पुरुषी एकवचन भगवान् असे होते म्हणून बुद्धिवान आणि श्रीमत् चे प्र. पु. ए. व. श्रीमान् म्हणून बुद्धिमान, मराठीत पाय मोडत नाहीत. या शब्दांची अनेकवचने श्रीमन्तः , भगवन्तः अशी होतात त्यामुळे मराठीत अनेकवचनी वापरताना बुद्धिवंत (उदाःबुद्धिवंतांचे औदासिन्य ) वापरले जाते पण श्रीमंत मात्र एकवचनी पण वापरला जातो उदाः श्रीमंत माणूस. मराठीत तरी दोन्ही प्रत्यय लावले तरी काही फरक आहे असे वाटत नाही.मराठीत मराठीचाच वापर इतक्या भोंगळपणे केला जातो की संस्कृतचा वापर करताना फारशी दक्षता घेतली जात असावी असे वाटत नाही.