हे दोन्ही प्रत्यय सारख्याच अर्थाचे आहेत. म्, अ किंवा आ शेवटी किंवा उपान्ती असल्यास मत्चे वत् होते. कचटतप या वर्गातल्या पहिल्या चार अक्षऱांपुढे मत् आल्यास त्याचे वत् होते. असे असले तरी, या नियमाला अनेक अपवाद आहेत.
मत्-वत्चे शब्दः--रसवान, रूपवान, गुणवान, गंधवती, विद्यावान, भगवती, कर्तृत्ववान इ. इ. परंतु, श्रीमान, बुद्धिवान/बुद्धिमान वगैरे. मराठीत वंत आणि वान तसेच मंत आणि मान एकाच अर्थाने वापरले जातात असे दिसते आहे.