तुमच्या संगणकावर बरहा 7.O डायरेक्ट, किंवा बरहा आय.एम.ई 1.० असेल तर, तर ते चालू करा. पडद्यावर उजव्या खालच्या कोपर्‍यात मराठीचा आयकॉन येईल.  मनोगत उघडा, इंग्रजीचा पर्याय ठेवा.  आता बरहा वापरून मराठी टंकलेखन करता येईल. मनोगतावर छन्‍न आणि छत्‍र, प्रश्‍न आणि प्रश्‍र सारखेच दिसतात, ते नीट उमटवता येतील.   पण नैरृत्य हा शब्द फक्त मनोगतावर टंकता येतो; बरहावर, इंडिकवर किंवा अन्य कोणत्याही युनिकोड फ़ॉन्ट्स मध्ये तो नैऱृत्य असा उमटू शकेल. ऍ फक्त मनोगताचे टंक वापरून टाइप करता येतो.  इतरत्र युनिकोडवर ए वर चन्द्र असा उमटतो.  इन्टरनेट एक्सप्लोरर ऐवजी मोझिला फायफॉक्स असेल तर अक्षरे आणखी वेगळी दिसतात.