वा! वाचनवेडाने भारावलेले असंच काय काय करत असतात.
काही वर्षांपूर्वी मी पण असाच एका पुस्तकाचा शोध घेतला होता. विन्स्टन चर्चिल लिखित 'द ग्रेट कंटेपोररीज' हे ते पुस्तक. वि. ग. कानिटकर लिखित 'विन्स्टन चर्चिल चरित्रा'त त्या पुस्तकाचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. मी प्रकाशकांना, कानिटकरांना सगळ्यांना पत्रं लिहिली होती. कानिटकरांचं मला उत्तर देखील आलं होतं की ते पुस्तक आता 'आऊट ऑफ प्रिंट' आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला ते पुस्तक नंतर माझ्या आजोबांच्या खाजगी संग्रहात मिळालं !!! आता ते माझ्या कपाटात आहे हे सांगणे न लगे :)