एका अर्थी बरोबर आहे तुमचे ! आज तुम्हाला ही पुस्तके वाचून तेवढी भावणार नाहीत. पण बालपणी वाचलेल्या पुस्तकांशी बरेच काही निगडीत असते.. भावना, आठवणी.. तेवढी तन्मयता मोठेपणीही देणारी पुस्तके विरळच ! पाडस बऱ्यापैकी मोठे झाल्यावर वाचले , त्यामुळे "लॉरा" जशी आपली वाटे, तसे नाते ज्योडीशी जमले नाही, पुस्तक खूप आवडले तरी. शिवाय इतर काही पुस्तके, उदा. कोरलईचा किल्लेदार, लहानपणी खूप आवडे, आता एकदा वाचायला घेतले तर चक्क थोडे रटाळ आहे असे जाणवले. तरीही मोठेपणीही आनंद देणारी दुसरी पुस्तके आहेतच, म्हणून बरंय ना ? :)