श्री कुशाग्र यांनी एक मस्त मुद्दा मांडला. मजा आली. पण प्रामाणिकपणे सांगतो, माझा कवितांचा कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित पार पडला, दुसऱ्या स्थळावर! माझ्या कार्यक्रमात अडचण येत होती हा माझा खरच आक्षेप नाहीये. याचे कारण माझा कार्यक्रम अत्यंत लहान प्रमाणावर (कुणाच्याही घरातसुद्धा करता येईल ) असा होता.
आक्षेप आहे तो गांधीभवनातच शरम वाटेल असे वर्तन करण्याला.
चर्चेने एक वेगळे वळणही घेतलेले दिसते.
१. श्रीराम सेनेने जे कृत्य केलेले माननीय हॅम्लेट यांनी सांगीतलेले आहे ते खरच दुर्दैवी आहे. अशी सेना स्क्रॅप केली पाहिजे.
२. कामसूत्र अन व्हॅलेंटाईन डे - मला व्यक्तिशः असा कुठलाही डे साजरा करण्यात काही हरकत घेण्यासारखे वाटत नाही. लैंगिक आकर्षण हे नैसर्गीक असल्याने कामसूत्र भारतात लिहिले गेले यात काहीही विशेष नाही. कुठल्याही संस्कृतीमध्ये त्या विषयावर काही ना काही लिहिले जाणारच. कामसूत्र चालते पण व्हॅलेंटाइन डे चालत नाही असे मला म्हणायचे नाहीच. एकंदर दरडोइ उत्पन्न व राहणीमान वाढले की माणूस 'साजरीकरणाकडे' वळतो हेही नैसर्गीक आहे. जसे महाराष्ट्रात पुर्वी गरबा व्हायचा नाही, आता होतो, कारण वेळ, पैसे असल्यावर मजा घेणे हे नैसर्गीक आहे. मदर्स डे हा तर विनोदच आहे. ज्या देशात आई अन मुलगा बहुतांशी एकाच घरात राहतात तेथे मदर्स डे ला काय महत्त्व द्यायचे? एकंदर माझा मुद्दा संस्कृतीरक्षणाचा नसून असा होता की स्थळाचे भान ठेवले गेले नाही, जे स्थळ संपूर्ण भारताचे पिता म्हणले जाणाऱ्या व्यक्तीचे आहे.
३. जे गणपती/नवरात्रात चालते ते गांधींच्या नावाखाली का नाही? - असा प्रश्न विचारून सन्माननीय रुचा मुळे ( सॉरी, मला अजून दुसरा रू कसा टाईप करायचा ते माहीत नाही ) यांनी एक भयंकर क्रांतिकारक मुद्दा मांडला आहे. कृपया लक्षात घ्या की तो कार्यक्रम ( जलसा २००९ ) हा गांधींसाठी किंवा गांधींसंदर्भात नव्हता. तो फक्त तिथे होता. गांधींच्या नावाखाली माझ्या मते असे कुणी करू नये. कारण ते व्यक्तिमत्व आपल्या देशातील एक नंबरचे व्यक्तिमत्व समजले जाते. आजही स्वातंत्र्यलढा वगैरे विषय निघाले की पहिले नाव तेच मनात येते. तेव्हा त्यालाच धक्का लागेल असे वर्तन नसावे असे वाटते.
बाय द वे,
श्रीराम लागू यांनी भारताची संस्कृती महान आहे असे विधान करणे हा विरोधाभासाचा कळस आहे. त्यांचा जो इतिहास ऐकायला मिळतो त्याच्या पार्श्वभूमीवर!