संस्कृतीच्या गळ्यात अनेक जडशिळ धोंडी बांधून तिला बुडवण्याचा जो प्रकार चालला आहे त्यातल्या याही काही धोंडी...
१) सरस्वतीचे विसाव्या शतकातील विवस्त्र चित्र. सोळाव्या शतकापर्यंतची अनेक देवदेवतांची विवस्त्र / अर्धविवस्त्र चित्रे / शिल्पे ही जतन करून ठेवण्याचा राष्ट्रीय वारसा असतात. मात्र विसाव्या शतकात त्याने धर्म आणि संस्कृती दोन्ही बुडतात.
२) समलिंगी संभोग. हा जरा वादाचा हळवा प्रांत आहे. म्हणून अधिक खोलात शिरत नाही. जाणकारांना कल्पना येईलच.
३) करिअरिस्ट स्त्रिया. अधिक सांगणे न लगे.......
सुचेल तसे आणिक लिहीत जाईन..........
पण एक आवाहन आहे! संस्कृतीला तारा हो... एकता कपूरला तिच्या कार्यात साथ द्या.................