दक्षिण याचा आणखी एक अर्थ उदार असा आहे आणि दाक्षिण्य म्हणजे औदार्य. यामुळे औदार्य, ऋजुता, सौजन्य असा त्याचा अर्थ असावा. डाव्या उजव्याशी त्याचा संबंध नसावा असे वाटते.
'पुरुष दाक्षिण्य' असा शब्द अस्तित्वात नाही हे ध्यानी घ्यावे!
असा शब्द पुरुष प्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे पुरुषांसाठी कदाचित वापरला गेला नाही इतकेच. पुरुषांप्रती दाक्षिण्य दाखवण्याच्या वेळा फार कमी आल्यामुळे तो प्रचलित झाला नसावा. असा शब्द अस्तित्त्वातच नाही असे अजिबात नाही. 'दाक्षिण्य' असा शब्द असल्यामुळे तो कुणाच्याही बाबतीत वापरता येऊ शकतो.
पूर्वीच्या राजांच्या गुणवर्णनात प्रजा दाक्षिण्य असा शब्द सापडतो. अनेक लोकांच्या औदार्याचे वर्णन करताना 'दाक्षिण्य' एव्हढाच शब्दही सापडतो.
आणखी एक..... आपण दिलेली अर्धनारीनटेश्वर आणि वामांगी रखुमाई ही उदाहरणे अर्धांगिनीची आहेत स्त्री दाक्षिण्य अर्धांगिनीबाबत (पत्नी) असले पाहिजे असे काही नाही. शिवाय ते पुरुषानेच दाखवलेले असले पाहिजे असेही नाही.