बीमोड ह्या शब्दाचा अर्थ नायनाट असा म्हणजे समूळ नाश असा काहीसा आहे, हे खरे; पण तो वापरण्याचा हेतू सामान्यतः वाईट गोष्टीच्या (व्हायला हव्या अशा) नाशाचे वर्णन करण्यासाठी वापरतात, असे वाटते. (उदा. दुष्टांचा, शत्रूचा, कीटकांचा बीमोड ... )
त्यामुळे पृथ्वीच्या नाशाचे वर्णन करण्यासाठी त्या शब्दाची केलेली निवड नकोशी वाटते.