माझी नागपूरची मावशी एकदा महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याला पहाटे पोहोचली. रिक्शावाल्याने आमच्या घराच्या पत्त्यावर तिला सोडले, तर वाड्याचा दरवाजा आतून बंद. सगळीकडे अंधार. तेव्हा रिक्शावाला तिला म्हणाला, "काळजी करू नका. तुमचे भाऊ जवळच राहतात ते मला माहीत आहे तेथे मी तुम्हाला सोडतो." मावशीचे आश्चर्य पाहून तो म्हणाला, "इथे राहणाऱ्या बाईंची तुम्ही बहीण आहात ते मला चेहऱ्यावरून कळले, आणि त्यांचे भाऊ कुठे राहतात ते मला माहीत आहे!"
अशा प्रकारे रिक्शावाल्याने शेवटी पहाटेच्या अंधारात तिला माझ्या मामाकडे सोडले.