पत्ता तो ही पुण्यात आणि तो ही रात्रीच्या वेळी!!!!! धाडसाचे काम. अहो पुण्यातले लोक दिवसा सरळ उत्तरे देणार नाहीत. आणि तुम्ही रात्री चौकशी केलीत तर काय सांगतील कप्पाळ?  अहो माहित असेल तरी बरोबर उलट्या दिशेला पाठवतील तुम्हाला. वर सल्ला देतील. पत्ता माहित नसेल तर आलात कशाला? पूर्ण माहिती घेवून येत जा! अगदी पुणेरी ठसक्यात बोलतील हो!!!

आणि महेशने जो अनुभव सांगितला आहे ना, तो रिक्शावाला नक्की पुण्याबाहेरचा असणार. नाहीतर पुणेकरांची एवढी मेहेरबानी नसते कोणावर.

बाकी तुमचा लेख छान!