...'ण' आणि 'ळ' या विशिष्ट / अतीविशिष्ट वर्णाक्षरांमुळेच असे माझे ठाम मत आहे. त्यांचे शुद्ध उच्चार मराठीला एक वेगळेच महत्त्व देतात. मराठी भाषेला, संवादाची भाषा, या व्यतिरिक्त मानवी मेंदुला / मेंदुंना [ स्वतःच्या किंवा इतरांच्या ] चालना देणारी "आज्ञावली" ची भाषा या दृष्टिकोणातून पाहिल्यास या अक्षरांचे महत्त्व जाणवते. मराठी ईतिहास, मराठी संस्कृती, मराठी मनाची विचार शैली, मराठी कर्तुत्व हे सर्व सर्व तुलनात्मक , उत्तम, उदात्त आणि उन्नत असण्याचे प्रमुख कारण म्हणजेच या भाषेची, संस्कृताशी असलेली जवळीक.
उच्चार हा एक संस्कार असेल. तो फार फार प्रयत्नांनी सिद्ध होतो. ज्यांना संस्कृताची गोडी, कमीवयात लागते, त्यांना मराठीचे शुद्ध उच्चार जड जातच नाहीत.
अमराठींच्या उच्चारांबद्दल कळवळा का असावा याचे सुयोग्य कारण, त्यांच्या समाज बोलीत उपरोक्त वर्णाक्षरांचा अंशतः वा पुर्णतः अभाव, हे असू शकते. त्यांच्यातही किंवा उर्दू मायबोली असलेल्या भाषिकांतही जेंव्हा मराठी 'ण' व 'ळ' सकट , सुस्पष्ट उच्चारणाऱ्या व्यक्ती दिसतात तेंव्हा, अमराठींच्या उच्चारा बाबतचा सर्व भ्रम आपसुकच गळून पडतो.
अमराठींच्या, अपभ्रंशीत उच्चारा मधे, त्यांची हेतुःपुरस्सरता, जास्त आहे, असे माझे वस्तुनिष्ठ व निरपेक्ष निरिक्षण आहे. " आम्ही वाकडेच" ,तुम्हाला आमच्याशी , उच्चारांशी जुळवून घेण्यास आम्ही "येण केण प्रकारेण " बाद्ध्य करुच, हा चंग त्यांनी बांधल्याचे अनेक बाबतीत आढळते.
सुक्ष्म निरिक्षणात दिसेल की, दिखाऊ रुबाबदार रहाणीमाना पासून ते वाकडे उच्चारांपर्यंत, हे लोक "ईंग्रजांचे" [ शासकाचे ] अनुकरण करतात आणि "स्व-आदर लवकर गमावणारा" , "बिचारा" मराठी माणुस, त्यांच्या "कुप्रभावा"त [मानसिक गुलामगिरीत] लवकर अडकतो. कोणत्याही अमराठी औद्योगीक व्यवस्थापकाचे तर हे हुकमी तंत्र असते.
आमच्या "उत्पादन" क्षेत्रात, विश्लेषणाच्या उन्नत पद्धती असतात. एखाद्या व्यक्तीच्या , "डिफेक्ट" / " दोष" शोधन पद्धतीत:
१. तो ते काम करू शकत नाही,
वा
२. ते काम करण्याची, त्याची इच्छा नाही.
असे , सरळ विश्लेषण असते.
या नियमांना अनुसरून , अमराठींच्या , अपभ्रंशीत उच्चारांचे " दोष" शोधन ज्याने त्याने करावे.