शेतात बी पेरले आणि काही कारणाने ते उगवले नाही, किंवा अशक्त रोपे उगवली तर त्या जमिनीची बी-मोडणी, जमिनीचा बीमोड करावा लागतो. त्यामुळे पृथ्वीवर उगवलेल्या झाडांची कत्तल करणे म्हणजेच पृथ्वीचा बीमोड करणे!
'बीमोड' असाच्या असा शब्द मोल्स्वर्थ किंवा वझ्यांच्या शब्दकोशात मिळाला नाही. मात्र तेथे बी मोडणे चा अर्थ समूळ नाश करणे अशा अर्थाशी मिळता जुळताच मिळाला. (पाहा : दुवा क्र. १ )त्यामुळे जमिनीचा बीमोड हे समजून घेणे जरा अवघड जात आहे.
कदाचित शेतीव्यवसायातले लोक जमिनीची बी-मोडणी असा प्रयोग असावेत, तसे असेल तर पृथ्वीचा बीमोड हे बरोबर वाटेल, हे खरेच.