सवाई आणि गणपती ह्या दोन जगप्रसिद्ध पुणेरी उत्सवांत हा अनुभव पुणेकरांना येतो. जगभरातली मंडली या उत्सवांना इतक्या आशेने येतात. आपण इतक्या लांबून आलो तर पुणेकर आपल्या स्वागताला आदरातिथ्याला अगदी तर्यार असणार असा त्यांचा विश्वास असतो  त्यामुळे शिवाजिनगर स्वारगेट इथपासून ते शोधाशोध सुरू करतात. माझ्या एका मित्राचे घर स्वारगेटाजव्ळ आहे. तिथे गणपतीत एक माणूस सकाळी सकाळी येऊन अमुक गणपती कुठे आहे ते विचारू लागला. ही नेहमीची डोकेदुखी असल्याने ह्या आमच्या पुणेरी हिरोने त्याला सांगितले, "थोडा पुढे जा आणि सणसपुतळ्यापाशी उभा राहा. त्या गणपतीउत्सव वाल्यांची एक मिनिव्हॅन येते आणि पुण्यातले मोठे गणपती फुकटात दाखवते, ते पाहा."