माझ असाच एक अनुभव आहे. मला असाच एक पत्ता शोधायचा होता. "गल्लीत वळले की उजव्याहातचे तिसरे घर" असा पत्ता दिलेला होता. शिवाय "गल्लीत शिरल्यावर कुणालाही विचार" हेही वर सांगितलेले होते. वेळ अगदी सकाळची होती. मी गल्लीत वळले आणि घरे कशी मोजायची ते कळेना. उजव्या हाती जी घरे होती त्यातल्या पहिल्या घराचा दरवाजा मोठ्या रस्स्त्यावर होता. त्यामुळे ते मोजायचे की नाही ते कळेना. तितक्यात समोरून एक आजोबा दूध आणायला चाललेले दिसले. त्यांना मी तो पत्ता विचारला.
ते बहुदा शिक्षक असावेत. त्यांनी मला "तिसरे म्हटले आहे ना, म्हणजे मग .... " असे म्हणत उजवीकडची घरे १ - २ - ३ अशी मोजून दाखवली, " ... म्हणजे हे" असे म्हणाले आणि चालते झाले!
-मेन