बीमोड या शब्दाचा तुम्ही दिलेला अर्थ लक्षात घेतला तर ती घोषणा अधिक चुकीची ठरावी. न उगवलेले बी किंवा अशक्त रोप काढून टाकणे या अर्थी जमीनीचा बीमोड करणे म्हणजे ती जमीन पुन्हा नीट करणे, लागवडयोग्य करणे. जमिनीचा तो बीमोड हा चांगलाच. त्याउलट या घोषणेतील बीमोड. या घोषणेत वृक्षतोड करणे अनुचित आहे हे सांगावयाचे आहे. अशी वृक्षतोड केल्याने जर (तुम्ही म्हणता त्या अर्थी) बीमोड होणार असेल तर वृक्षतोड चांगलीच म्हणावी लागेल. आता या घोषणेतून नेमके सांगावयाचे आहे काय? वृक्षतोड करून (तुम्ही म्हणता तसा) जमिनीचा/पृथ्वीचा बीमोड करा हे सांगावयाचे आहे की, वृक्षतोड केल्याने पृथ्वीचा (महेश म्हणतात त्याप्रमाणे नायनाट वगैरे) बीमोड होईल?
बीमोड या शब्दाचा लक्षणेने आलेला अर्थ ध्यानी घेता आजच्या काळात जनजागृतीसाठी दिल्या जाणाऱ्या घोषणेत त्या शब्दाचे मूळ अर्थाने केलेले प्रयोजन काय साध्य करेल? इथे तर मराठीविषयीही जागृती निर्माण होण्याची शक्यता नाही.
आणि माझे हे विश्लेषण चुकत असेल तर घोषणेत बीमोड करणारा कल्पकच आहे. त्याचे अभिनंदन.