बीमोड म्हणजे सर्वनाश हे लोकांना पटले. हा नाश केवळ शत्रूंचा किंवा रोग आणि जंतूंचा नाही हेही मान्य झाले.   मूळ शब्द शेती व्यवसायातला असावा हेही लाजेकाजेस्तव स्वीकारले गेले.  आता हेही विचारात घ्यावे. :---झाडे लावणे ही शेती का नसावी? रान, बाग आणि शेती यांच्यात काही साम्य आहे की नाही?  जो शब्द शेतजमिनीच्या संदर्भात चालतो तो, झाडे ज्या भूमीवर उगवली आहेत त्या पृथ्वीच्या संदर्भात चुकीचा का ठरावा?

जमिनीचा बीमोड करणे ही अतिशय सुखाची घटना आहे, असे वर एका प्रतिसादात म्हटले आहे.  शेतकरी प्रचंड कष्टाने शेत नांगरतो.  त्याच्या मते उत्कृष्ट असलेले बियाणे आणून ते मोठ्या मेहनतीने शेतात पेरतो. बियाणे खराब निघाले, पेरणीनंतर हवा तसा पाऊस पडला नाही, अतिवृष्टी झाली, कोणीतरी दुष्टाने उगवलेली रोपे गुरे घालून उद्ध्वस्त केली, रोपांना किडीचा संसर्ग झाला, या किंवा अशा काही अन्य कारणामुळे शेतीत उगवलेली रोपे मुळासकट उपटून जमिनीत पडलेले बीन्‌बी शोधून फेकून देण्यात शेतकऱ्याला केवढा आनंद होत असेल! आणि वर त्याला परत शेत नांगरायची गंमत लुटायला मिळते.  केवढी मज्जा!

ज्या अर्थी प्रस्तुत शब्द पृथ्वीच्या संदर्भात वापरला आहे आणि, पृथ्वी हा शत्रू किंवा रोग नाही हे नक्की माहीत आहे, त्या अर्थी, बीमोडचा मूळ अर्थच येथे लागू पडतो, यात कसलीही शंका असू नये. वृक्षतोड केली की पृथ्वीचा बीमोड(नायनाट!) होईल, हे काव्यात सांगायच्या प्रयत्‍न करणार्‍या कवीचा आपण अकारण हिरेमोड करू नये.